Youtubeआणि Facebook च्या आधी तो व्हायरल झाला...

in #in2 years ago

दिग्गज कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने मनोरंजन विश्व सुन्न झाले. आपल्या विनोदबुद्धीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर राजू यांनी हसू आणलं होतं . राजू तर गेले,मात्र त्यांच्या आठवणी त्यांच्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्यात नेहमीच असतील.त्यांची प्रसिद्धि ही घराघरात पोहचलीयं,मात्र ही प्रसिद्धि त्यांना सहसा मिळाली नाही.त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते.एका इंटरव्यूत त्यांनी सांगितलं कि 'हंसना मना है' या टी सिरीजची कॅसेट प्रसिद्ध झाली. जी खूप हिट झाली. लोक ती रिक्षात खूप आवडीने ऐकत असतं. राजू स्वत: त्याचा आनंद घेत आणि मुद्दाम त्यांना म्हणत,"हे काय ऐकत आहे,बंद करा ,काहितरी चांगल लावा. यावर रिक्षावाला म्हणायंचा की,नाहि ओ दादा ,कुणी तरी श्रीवास्तव आहे.खूप हसवतो."जेव्हा त्यांना राजू श्रीवास्तव सारखी कॉमेडी करण्याचा सल्ला मिळाला त्याचाही किस्सा त्यांनी सांगितलायं . ट्रेनमध्ये ते 'शोले'ची स्टोरी प्रवाशांना त्यांच्या मनोहर या पात्राच्या स्टाईलमध्ये सांगत होते, तेव्हा वरच्या बर्थवर बसलेल्या काकांनी ते ऐकले आणि म्हणाले, "तु जे हे करत आहात ते वेगळ्या पद्धतीने कर. यात अजून थोडी मेहनत करं.त्याची कॅसेट बनव बॉम्बेमध्ये तुझीही कॅसेट येईल ... श्रीवास्तवची एक कॅसेट आहे त्याच्याकडून आइडिया घे ना."

Sort:  

hi