उद्धव ठाकरेंचं, 'बाप चोरला' विधान शिंदे गटाच्या जिव्हारी; म्हणाले मुख्यमंत्रीपद..

in #in2 years ago

मुंबई - राज्यातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष टोकाला जाताना दिसत आहे. त्यातच दसरा मेळावा आता तीन दिवसांवर असून दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेली बाप चोरल्याची टीका शिंदे गटाच्या जिव्हारी लागल्याचं दिसून आलं आहे. (Shahaji Patil news in Marathi)उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला होता. त्यात दररोज भर पडत आहेत. मात्र शहाजी पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. शहाजी पाटील यांना चंद्रकांत खैरे यांच्या हिमालयात जाण्याच्या विधानवर प्रतिक्रिया विचारली असता, पाटील म्हणाले की, हिमालयात गुहा कशी बुक करायची हे आपल्याला माहित नाही. त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. मात्र एक वर्षाने तुम्हाला चंद्रकांत खैरेंना भेटायला हिंमालयात जावं लागेल.यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, बाप चोरला, हे विधान मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या व्यक्तीच्या तोंडी शोभत नाही. आमच्यावर काय बोलावं हे त्यांना सुचत नाही. मग विकले गेले, खोके, असं बोलतात, असंही पाटील यांनी नमूद केलं.शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बंडखोरांनी बाप चोरल्याची टीका केली होती. मुलं पळवणारी टोळी ऐकली होती. मात्र आता बाप चोरणारे देखील आलेत, असं म्हणत उद्धव यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

Sort:  

hi