Manasi Naik: 'माझी मुलींना हात जोडून विनंती...'; लग्न करताना कुठे चुकलं यावर स्पष्टच बोलली मानसी नाईक

in #hingoli2 years ago


Manasi Naik: मानसी नाईक हे नाव सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. आता मराठी अभिनेत्री आहे तर तिचा एखादा सिनेमा येतोय म्हणून नाही तर अलीकडे मानसी चर्चेत आली ते तिच्या घटस्फोटामुळे. सोशल मीडियावर नवरा प्रदीप खरेरा सोबत अनेकदा तिचे डान्सिंग रील्स पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला,इतकं सगळं छान होतं मग अचानक घटस्फोट? आता मानसीनं घटस्फोटाची बातमी खरी आहे यावर स्वतः शिक्कामोर्तब केल्यानंतर अर्थातच कारण काय? हा प्रश्न अनेकांना पडला असणार यात शंकाच नाही. यासंदर्भात मानसी नाईकनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कारणांची भलीमोठी लिस्ट भावूक होऊन सांगितलीच पण तिनं या मुलाखतीत आपण लग्नाचा निर्णय घेताना कुठे चुकलो हे कारण सांगत लग्न करण्यास इच्छुक मुलींना एक कळकळीची विनंती देखील केली आहे. नेमकं काय म्हणाली मानसी नाईक...हे जाणून घ्यायचं असेल तर या बातमीत तिच्या मुलाखतीची लिंक जोडली आहे..ती संपूर्ण मुलाखत ऐकाल तर मानसीला दोष देणाऱ्या अनेकांना याचं उत्तर मिळेल कदाचित...(