Bappi Lahiri Birth Anniversary: 'या' कारणामुळे बप्पी लहरी यांचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होते नाव

in #hingoli2 years ago


गायक बप्पी लहरी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. बप्पी लहरी यांचे खरे नाव फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी होते. त्यांचे वडील एक प्रसिद्ध गायक होते तर त्यांची आई संगीतकार आणि गायिका होती. त्यामुळे त्यांना संगीताचा वारसा मिळाला.40 वर्षांहून अधिक काळ 'डिस्को डान्सर'पासून 'ऊ ला ला' पर्यंत एकापेक्षा एक गाण्यांवर संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या बप्पी लहरी यांनी सर्वांना आपला चाहता बनवलं होतं. लोकांना त्यांची गाणी खूप आवडली. गाण्यांव्यतिरिक्त, त्यांनी अनेक कर्तृत्व देखील केले होते, ज्याबद्दल कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका यशाबद्दल सांगणार आहोत.हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....