Nashik : वाहतूक कोंडीमुळे मालेगावकर बेजार; मद्याची दुकाने ठरतात अडथळा

in #ganpati2 years ago

मालेगाव शहर (जि. नाशिक) : आधीच दाटीवाटीचे शहर... त्यात वाहतुकीला अडथळे... त्यामुळे मालेगावात सायंकाळची वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. शहरातील मुख्य चौकातील दारू दुकानांमुळे संध्याकाळच्या कालावधीत वाहतूक कोंडी निर्माण होत असते. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. (Malegaon people upset due Liquor shops hindrance to traffic jam Nashik Latest Marathi News)

शहरातील मुख्य रस्त्यावरच दारू विक्रीची दुकाने आहेत. यामध्ये गजबजलेल्या मोसम पूल, संगमेश्‍वर, सटाणा नाका, मोतीबाग नाका, रावळगाव नाका, डि. के. चौक, सोयगाव भागात मध्यवर्ती ठिकाणी वाईनशॉप असल्याने सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सायंकाळी सहानंतर मद्यपान करणारी बाहेरगावची मंडळी आपली तजवीज करण्यासाठी येतात. साधारण रात्री नऊपर्यंत ही लगबग असल्याने ‘पार्सल’ घेऊन तेथून निघण्याची घाई असल्याने वाहन कसेतरी रस्त्यावर लावतात. परिणामी, सामान्य नागरिकांच्या वाहनांची कोंडी होते. अशावेळी वाहतूक पोलिस नसल्याने बराच वेळ मार्गस्थ होण्यात जातो. यात छोट्यामोठ्या प्रकारची बाचाबाची होते. विशेषत: रावळगाव नाका परिसरात शॉपच्या आसपास फास्ट फूड, चायनीज, अंडा भुर्जी अशा व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे नागरिकांची गर्दी असतेच. दारू दुकानासमोरील रस्त्यावर वाहने मात्र कोंडी करतात. याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने हा कित्ता रोजच गिरवला जात आहे. सायंकाळी महिला बाहेर पडतात. त्यानंतर हमखास वाहतुकीत अडकण्याचा प्रसंग येतो. त्यामुळे अनेकदा रस्ता बदलावा लागतो. या समस्येवर लक्ष देण्याची मागणी सामाजिक संस्था व नागरिकांनी केली आहे.AHB22B03386.jpeg