प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण, कारण विचारल्यानंतर म्हणाले

in #ganpati2 years ago

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळं सोनं अर्पण केलं आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. आपण केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचं प्रताप सरनाईक यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे.

“तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसंच दोन्ही नातवंडांचं जायवळ करायचं होतं. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असं म्हटलं होतं. मध्यंतरी करोना काळ आणि काही संकटांमुळे येता आलं नव्हतं. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेलं नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.Pratap-sarnaik-1.jpg