सकाळी मुलीचा जन्म सायंकाळी आई लखपती, महिलेच्या घरी लक्ष्मी चालून आली...

in #ganpati2 years ago

वॉशिंगटन: मुलगी झाली ती ओझं आहे हे मानून जन्मताच तिचा त्याग करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. पण, तिच मुलगी तुमच्या घरात सुख-समृद्धी देखील आणते. याचंच एक उदाहरण सध्या चर्चेत आहे. जिथे एका महिलेने सकाळी मुलीला जन्म दिला आणि सायंकाळी ती ८० लाखांची मालकीन झाली. मुलीला जन्म दिल्यानंतर महिलेचे नशीबच बदलले. ती अचानक ८० लाख रुपयांची मालक बनली. या महिलेने तिच्या मुलीला लकी चार्म असं म्हटलं आहे. मला वाटतं की माझ्या मुलीनेच माझे नशीब बदलले आहे, मी तिची खूप आभारी आहे, असंही ती महिला म्हणाली.baby-95973501.jpg