मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी मातेची कृपा हवी असेल तर 'या' चार गोष्टी आठवणीने करा!

in #ganpati2 years ago

काही लोकांची वृत्ती असते उधळपट्टी करण्याची तर काही लोक अगदीच कंजूष असतात. मात्र व्यवहारी जगात दोन्ही टोकं गाठून चालत नाही, तर मध्य गाठावा लागतो. यासाठी आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे! लक्ष्मी मातेला तीच लोकं प्रिय असतात, जी आपल्या संपत्तीचा यथायोग्य वापर करतात. तर हा वापर नेमका कसा आणि कुठे करायला हवा, तेही जाणून घेऊ.

पैसा काटकसरीने वापरायला हवा आणि आपल्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठीदेखील खर्चायला हवा. त्याचबरोबर पैशांची गुंतवणूक, साठवण हाही आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा भाग असतो. जेणेकरून आपल्या पडत्या काळात मदतीसाठी दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे बघावे लागणार नाही! त्याचबरोबर सामाजिक जाणीव ठेवून आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय हितासाठी खर्च करावा असे शास्त्र सांगते. यासाठी पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

धार्मिक ठिकणी दान : धर्मकार्यात आर्थिक मदत करावी. कारण तिथे खर्च केलेला पैसा कोणाच्या व्यक्तिगत उन्नतीसाठी नसून अनेक गरजू लोकांच्या जीवनावश्यक गरजा पुरवण्यासाठी वापरला जातो. एरव्ही आपण कोणा एकाला मदत करण्यासाठी पुरे पडू शकू असे नाही, मात्र धर्मकार्यात उचललेला खारीचा वाटा आपल्याला एकाच वेळी अनेकांचे शुभाशीर्वाद मिळवून देतो. new-project-2022-11-24t143429.217_202211916468.jpg