जेव्हा ती एकटी...', मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच

in #ganpati2 years ago

मुंबई : मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल म्हणजे लाईफलाईन आहे. रोज हजारो लोक मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. कामानिमित्त महिलांना रोज घराबाहेर पडावं लागतं. कधी पहाटे तर कधी अगदी उशिरा कामाला जाणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. अशात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. मुंबईत मात्र अनेकजणींना याबाबत फारशी चिंता करावी लागत नाही. कारण, रात्रीच्या अगदी शेवटच्या ट्रेनमध्ये सुद्धा महिलांच्या प्रत्येक डब्ब्यात सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी असतात. याबद्दल रात्री एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेला काय वाटते, तिच्या भावना व्यक्त करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.mumbai-viral-news-today-95819489.png