दादा, तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना पुण्यातील नेते मंडळी पोहोचून देत नाही; माधुरी

in #digras2 years ago

भाजपचे सरकार आले आहे. आता विविध महामंडळांवर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी मागणी करीत भाजपच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी, तुमच्यापर्यंत कार्यकर्त्यांना शहरातील नेते मंडळी पोहोचूच देत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या सत्कार समारंभातच मिसाळ यांनी व्यक्त केलेल्या या मताचे समर्थन उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केले. टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मिसाळ यांचे भाषण कार्यकर्त्यांना अधिक भावले. नेते मंडळी कार्यकर्ता मोठा झाला तर आपल्याला नुकसान होईल म्हणून, त्याला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता मागे राहत असून, त्याला न्याय द्या, अशी मागणी मिसाळ यांनी यावेळी केली.

“छोटे मन से कोई बडा नही होतातुटे मन से कोई खडा नही होता”

हा शेर ऐकवित त्यांनी यावेळी शहरातील पदाधिकाऱ्यांना सुनावले. तर भाजप सरकार नसताना आपले सरकार येईल की नाही या भीतीने जे कुंपणावर होते केवळ मलिदा पाहत होते, त्यांनाही यापुढे लक्षात ठेवा व आगामी निवडणुकीत निष्ठावंतांना न्याय द्या, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीचे उपस्थितांनी मोठ्या घोषणा देत स्वागत केले.

फटाके वाजविले तर मी परत जाईन

‘पुणे शहर - स्वच्छ शहर सुरक्षित शहर’ हा माझा संकल्प आहे. तरीही माझ्या निवडीच्या अभिनंदनाचे फ्लेक्स शहरभर लावले गेले. शहर विद्रूपीकरणात अशाच अनधिकृत फ्लेक्सचा मोठा हातभार असतो. तुम्हाला एवढीच हौस असेल तर अधिकृत बोर्ड भाड्याने घेऊन तेथे दहाऐवजी दोनच फ्लेक्स लावा, असे परखड मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच माझ्या कार्यक्रमात यापुढे फटाके वाजविले तर मी गाडीतून न उतरताच परत जाईन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Subscribe to Notifications
Get Latest Updates in Messenger
टॅग्स :Puneपुणेmadhuri misalमाधुरी मिसाळchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाPoliticsराजकारण
Open in App →

संबंधित बातम्या

पुणे आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्त्व्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

पुणे दुसऱ्याची घर तोडणे हा भाजपचा धंदा; नाना पटोलेंचा हल्लाबोल

पुणे Pune: महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार; चाकण येथील घटना

पुणे पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात एक जण जागीच ठार
पुणे Pune : मसाज सेंटरच्या नावाखाली चालू होता वेश्याव्यवसाय; चार पीडित परदेशी मुलींची सुटका
पुणे कडून आणखी

पुणे चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये जिल्हयातील वाशिम १० प्रवासी

पुणे नाशिकमध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; एसटी बसने घेतला पेट, सर्व प्रवासी बचावले

पुणे Maharashtra Politics: मोहन भागवतांच्या ‘त्या’ मताशी शरद पवार सहमत; म्हणाले, “हा बदल योग्य अन् समाधानकारक, पण...”

पुणे Nashik Bus Accident: थरारक प्रसंग! जिगरबाज आईनं घेतली पेटत्या बसच्या खिडकीतून चिमुकल्यासह उडी
पुणे Maharashtra Politics: “आमचं तुमच्यावर बारीक लक्ष, बंडखोरांकडून पैशाचा पाऊस, जागा दाखवून देऊ”; शिंदे गटाला इशारा

शहर
मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा
सेक्शन
मनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य
About UsAdvertise with UsPrivacy PolicyContact UsFeedbackSitemapTerms of UseStatutory provisions on reporting ( sexual offences )Code of ethics for digital news websites
FOLLOW US :
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd