तुम्हीही जेवणात गव्हाच्या पिठाची चपाती खाता का? थांबा, आताच वाचा ही बातमी

in #digras2 years ago

सहसा जेवणाची वेळ झाली, की आपण सर्वजण पोळी-भाजी, वरण भात, किंवा तत्सम पदार्थांना प्राधान्य देतो. शाळकरी मुलांपासून नोकरदार वर्गापर्यंत, सर्वजण डब्यातही पोळीभाजी, किंवा पोळी आणि त्याजोडीला काहीतरी नेतात. पण, ही गव्हाच्या पिठापासून (wheat roti) तयार करण्यात आलेली पोळी खरंच आरोग्यासाठी फायद्याची आहे का? शरीर निरोगी राहण्यासाठी काही घटक अतिशय महत्त्वाचे ठरतात. यामध्ये काही फॅटी अॅसिड, व्हिटामिन, मिनरल्स, कार्ब्स आणि प्रोटीनचा (Carbs, Proteins) समावेश असतो. (after reading benefits of eating jowar chapati you will forgot wheat roti)

COMMERCIAL BREAK

SCROLL TO CONTINUE READING
सध्याचं धकाधकीचं आयुष्य पाहता, त्यामध्ये गव्हाच्या पिठाची चपाती अगदीच फायद्याची नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण, याला पर्याय म्हणून जर ज्वारीच्या पिठाची भाकरी खाणं तुम्हाला शक्य होत असेल तर, हा पर्याय सर्वोत्तम ठरेल. कारण, यामध्ये तंतुमय पदार्थांचं (Fiber) प्रमाण जास्त असतं.

दैनंदिन आहारात ज्वारी- बाजरीच्या भाकऱ्यांचा (jowar Bhakri) समावेश केल्यास त्यामुळं हृदयविकार, टाईप 2 डायबिटीड आणि स्थुलता नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. यामुळं शरीरातील Uric Acid चं प्रमाणही नियंत्रणात राहतं.

वाचा : Tata Memorial Hospitals ला मोठे यश, ब्रेस्ट कॅन्सरवर महत्त्वपूर्ण संशोधन! एकदम कमी किमतीत उपचार

ज्वारीच्या पिठामध्ये बरेच फाईटोकेमिकल एंटीऑक्सीडंट असतात. त्यामुळं शरीराला सूज असल्याच आहारात या भाकरीचा समावेश केल्यास त्याचे थेट परिणाम तुम्हाला दिसू शकतील. शिवाय ज्यांना ( Acicity ) आम्लपित्ताचा त्रास आहे, अशा मंडळींनीही ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास आम्लपित्त नाशासाठी ते फायद्याचं ठरतं.

हाडं मजबूत करायचीयेत? (Strong bones)
हाडांच्या समस्या असणाऱ्यांनी आहारामध्ये गहूच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या चपाती किंवा तत्सम पदार्थाऐवजी ज्वारीच्या भाकरीला वापर वाढवावा. यामुळं शरीराला फॉस्फरससोबतच कॅल्शियमही (Calcium) पुरेशा प्रमाणात मिळतं. ग्लुटनमुक्त आहाराच्या सवयी अवलंबू इच्छिणाऱ्यांसाठीसुद्धा ज्वारीचं पीठ उत्तम पर्याय ठरतं.

ज्वारीचं पीठ नव्हे, शरीरासाठी वरदानच म्हणा!
ज्वारीच्या पिठापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांमुळे किंवा एका ज्वारीच्या भाकरीमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोट फुगणं, अपचन, अतिसार आणि पचनाच्या इतर व्याधींवर गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या चपात्यांऐवजी ज्वारीचं पीठ, ज्वारीची भाकरी म्हणजे रामबाण उपाय.

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. सदरील गोष्टी अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

ZEENEWS TRENDING STORIES
ही टीम वर्ल्ड कप जिंकून देणार का?, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव
ही टीम वर्ल्ड कप जिंकून देणार का?, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण...
Sushant Singh Rajput ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट, मोस्ट वाँटेड ड्रग सप्लायर गजाआड
Sushant Singh Rajput ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट, मोस्ट वाँटेड ड्र...
चहाप्रेमी आता रात्रीही पिऊ शकता चहा, जाणून घ्या 'स्लीप टी'चे फायदे
चहाप्रेमी आता रात्रीही पिऊ शकता चहा, जाणून घ्या 'स्लीप टी'चे फायदे
लालबागचा राजा मंडळाला दणका, मुंबई महापालिकेने ठोठावला दंड
लालबागचा राजा मंडळाला दणका, मुंबई महापालिकेने ठोठावला दंड
© India Dot Com Private Limited. All Rights Reserved.
Contact Us | Privacy Policy

Sort:  

Lik karo bhai hamari news ko