Video : ताकदीला तोड नाही! तिरुपतीजवळ मर्सिडीजच्या धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे Published on : 27 September 2022,

in #digras2 years ago

आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळ चंद्रगिरी बायपास रोडवर सोमवारी हा अपघात झाला. चुकीच्या बाजूने जाणार ट्रॅक्टर अचानक मर्सिडीज समोर आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरक्षः दोन तुकडे झाले. मात्र, यामध्ये मर्सिडीज कारचे फारसे नुकसान झाले नाही. या घटनेत कारमधील सर्वजण सुरक्षित असून, ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी देशातील मोठे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचाही रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी तेदेखील मर्सिडीजच्या कारमध्ये होते. मात्र, त्यांचे यामध्ये निधन झाले.
RECOMMENDED ARTICLES

Sanju Samson : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजू टीम इंडियाचा उपकर्णधार?
Sanju Samson India vs South Africa ODI Series : संजू सॅमसन सध्या भारत अ संघाचा कर्णधार आहे. भारत-अ आणि न्यूझीलंड-अ यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. उद्यापासून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 खेळणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. शिखर धव
5 hours ago

Asha Parekh : आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; हिंदू महासंघाचा विरोध
पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा पारेख यांना मिळालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारला हिंदू महासंघाचने विरोध केला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार काम पाहून का आडनाव पाहून? असा सवाल हिंदू महासभेच्या आनंद दवे यांनी केला आहे. (Asha Parekh Latest
5 hours ago

AR Rahman: 'तू कोण बोलणारी?' ए.आर. रहमाननं नेहा कक्करला सुनावलं
Neha Kakkar: देशात नव्हे तर ज्याच्या संगीताचे चाहते आहेत अशा ए आर रहमानच्या संगीताची गोष्टच वेगळी आहे. संगीतासाठी ऑस्कर मिळवल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. मणिरत्नम यांच्या रोजापासून रहमानच्या प्रवासाला सुरुवात झाली आज तो सातासमुद्रापार पोहचला आहे. सध्या रहमान हा त्याच्या एका
5 hours ago
Share Market : सणासुदीच्या काळात हा गारमेंट स्टॉक देईल तगडा परतावा...
शेअर बाजारातील प्रचंड घसरणीच्या दरम्यान, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांसाठी एक मजबूत स्टॉक निवडला आहे, जो गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी एसपी ऍपेरेल्सची (SP Apparels) निवड केली आहे. कंपनीने गेल्या 2 वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. ही कंपनी गारमेंट क्षेत्रात
5 hours ago
हेही वाचा: Asha Parekh : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सध्या तिरुपतीजवळ घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून, 38 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मर्सिडीज बेंझ कारच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत. हे दृश्य पाहून हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज बांधता येऊ शकतो. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही