Thakkar Bapa Birth Annniversary : ठक्कर बापांच्या पत्राला महात्मा गांधीजींनी लगेचच उत्तर धाडले!

in #digras2 years ago


ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Thakkar Bapa Birth Annniversary : ठक्कर बापांच्या पत्राला महात्मा गांधीजींनी लगेचच उत्तर धाडले!
Published on : 29 November 2022, 3:00 am

By
सकाळ डिजिटल टीम

Thakkar Bapa Birth Annniversary : आज थोर समाजसुधारक ठक्कर बापा यांची जयंती आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ठक्कर बापा कोण होते?. खरे तर ठक्कर बापा यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित शोषित समाजासाठी वाहले होते. त्यांच्यावर महात्मा गांधींजींच्या विचारांचा पगडा होता. ते गांधीजींचे अनुयायीही होते.

ठक्कर बापांचा जन्म २९ नोव्हेंबर १८६९ रोजी भावनगर गुजरात येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अमृतलाल ठक्कर होते. ते भारताचे स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक होते. त्यांच्या आईचे नाव मुळीबाई आणि वडिलांचे नाव विठ्ठलदास ठक्कर होते. अमृतलाल ठक्कर यांचे वडील व्यापारी होते. महात्मा गांधी त्यांना प्रेमाने 'बापा' म्हणत असत त्यामूळेच त्यांचे नाव बापा असे पडले.

हेही वाचा: Father Of Loksabha : पंतप्रधानांचा निरोप डावलून त्यांनाच भेटायला बोलावणारे लोकसभा अध्यक्ष गणेश माळवणकर

ठक्कर बापा यांनी १८८६ मध्ये मॅट्रिकमध्ये टॉप केले. 1890 मध्ये पूण्यातून सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. 1890-1900 मध्ये बापांनी काठियावाड राज्यात अनेक ठिकाणी काम केले. 1900-1903 दरम्यान, त्यांनी पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथे रेल्वे इंजिनीअर म्हणून काम केले. महाराष्ट्रातील सांगली राज्याचे मुख्य अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यावेळी गोपाळ कृष्ण गोखले आणि धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांची भेट झाली. अमृतलाल ठक्कर बॉम्बे म्युनिसिपालिटीत आल्यावर ते कुर्ल्यातील दलित वस्तीत गेले. या ठिकाणी डिप्रेस्ड कास्ट मिशनचे रामजी शिंदे यांच्या मदतीने त्या वस्त्यांमधील सफाई कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. 1914 मध्ये अमृतलाल ठक्कर यांनी नोकरी सोडली आणि 'सर्व्हेंट ऑफ इंडिया सोसायटी'मध्ये सामील झाले आणि ते पूर्णवेळ समाजसेवेत सक्रीय झाले. आणि ते पूर्णपणे सार्वजनिक सेवेत व्यस्त झाले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना गांधीजींना भेटायला लावले. 1915-16 मध्ये ठक्कर बापांनी मुंबईतील सफाई कामगारांसाठी सहकारी संस्था स्थापन केली. तसेच अहमदाबाद येथे मजुरांच्या मुलांसाठी शाळा उघडली. 'भिल सेवा मंडळ' स्थापन केले.

बापा नेहमीच आदीवासी लोकांचा विचार करायचे. त्यांनी मुंडा आणि ओराव आदिवासींच्या स्थितीचा अभ्यास केला होता. त्यामूळे अशा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजासाठी गांधीजींनी आदोलन करावे, असा आग्रह बापा यांनी महात्मा गांधी यांना केला होता. बापांनी गांधीजींना पत्रही लिहले होते. ही विनंती गांधीजी मान्य करतील असे ठक्कप बापा यांना स्वप्नातही वाटले नव्हते.

गांधीजींनी त्यांच्या पत्राला उत्तर दिले. आणि आपण तूम्ही म्हणत असलेले आंदोलन करू. त्यासाठी नियोजन सुरू करा असे गांधीजींनी ठक्कर यांना सांगितले. तसेच, गांधीजींच्या आदेशावरूनच ठक्कर बापा यांनी शेवटपर्यंत आदीवासी समाजासाठी काम केले.१९२२-२३ च्या दुष्काळात गुजरातमधील भिल्लांमध्ये मदतकार्य करत असताना तुम्ही 'भिल सेवा मंडळ' स्थापन केले. 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनादरम्यान त्यांना अटक करण्यात आली होती. 1932 मध्ये त्यांना समजले की, झालोडमधील काही आदीवासी पुरूष दारूच्या नशेत असतात. दिवसभर ते दारू पित असतात आणि पैसेही उडवत असतात. हा प्रकार थांबवण्यासाठी बापा बारिया या आदिवासी गावात 22 मैल चालत पोहोचले होते. तेथे जाऊन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह व विद्यार्थ्यांसह दारूबंदी व इतर समाजकंटकांचा निषेध केला.तिथे एका फलकावर त्यांनी लिहिले होते की, ‘दारू पिऊ नका, दारू प्यायल्याने नासाडी होईल, रोज आंघोळ करा, रोज आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहील. , दाद, खाज आणि रोग होणार नाहीत, जादूटोणा करणाऱ्यांना घाबरू नका, ते लुटारू आहेत, ते तुम्हाला फसवतील’.ठक्कर बापा 'हरिजन सेवक संघ' (अस्पृश्यता निवारण संघ) चे 1934-1937 पर्यंत सरचिटणीस होते. 1944 मध्ये ठक्कर बापांनी 'कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक निधी' ची स्थापना केली. त्याच वर्षी त्यांनी आदीवासी सेवा मंडळ स्थापन केला. गांधीजींनी त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला त्या विश्वासाचे त्यांना सोने केले. 20 जानेवारी 1951मध्ये त्यांचे निधन झाले.

Sort:  

Kripya news sahi lagaye