KBC 14 : नवरात्रीत खेळाचे नियम बदलले; महिलांना मिळणार विशेष सवलत Published on : 27 September 2022, 5:33 am By सकाळ डिजिटल टीम

in #digras2 years ago

Kaun Banega Crorepati News सोमवारी कौन बनेगा करोडपती १४च्या (KBC) एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, नवरात्री स्पेशल एपिसोड खूप खास असणार आहे. ‘नवरात्री दरम्यान देशातील ९ विविध राज्यांमधून ९ अतिशय खास महिलांना आमंत्रित करण्यात येईल. या महिला कौन बनेगा करोडपती १४ च्या मंचावर येतील आणि मनोरंजक खेळ खेळतील’ असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितले. म्हणजेच नवरात्रीमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये फक्त महिलांनाच संधी देण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी महिलांना स्टेजवर बोलावून सर्वांची ओळख करून दिली. परिचयानंतर फास्टेस्ट फिंगर फर्स्ट ठकलेली व मध्य प्रदेशातून आलेली राणी पाटीदार हॉटसीटवर बसली. अमिताभ बच्चन यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान राणीने सांगितले की, तिचे राज्य ३S साठी प्रसिद्ध आहे. ते म्हणजे ‘सेव, साडी आणि सोना’
RECOMMENDED ARTICLES

Shinde vs Thackeray Live : शिंदे गट कोणत्या भूमिकेच आयोगात गेला? कोर्टाचा सवाल
हाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत महासुनावणी सुरु आहे. पाच न्यायमुर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट कोणत्या भूमिकेतून आयोगात गेला? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे. निवडणुक आयोगाचा मुद्दा मुळ याचिकेतून निर्माण झाला आहे. असे कोर्टाने म्हटलं आहे. राजकीय पक्षाचे सदस्य असतील तर
5 hours ago

Sanju Samson : रोहित-विराट समोर पाहताच संजुच्या चाहत्यांनी केली नारेबाजी - VIDEO
Sanju Samson Ind vs Sa : विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांची टी-20 मालिका जिंकली आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 मालिका खेळायची आहे. पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपुरमला पोहोचला आहे. पहिला सामना बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुर
5 hours ago

भारतीय पोराला मानलं राव! 600 मेल्स अन् 80 फोन कॉल्सनंतर अमेरिकेत मिळवळी नोकरी
अनेकांच्या संघर्षाबद्दल तुम्ही बघितले अथवा ऐकले असेल. अनेकजणांना प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकदा पाहिलेली स्वप्ने अर्ध्यावर सोडावी लागतात. मात्र, अशा व्यक्ती हार पत्कारत नाही. जगात अशी अनेक लोकं आहेत ज्यांना काही कारणास्तव त्यांची स्वप्ने अर्ध्यावर सोडावी लागली आहे. परंतु, याच व्यक्तींनी नवा
5 hours ago
World Tourism Day : लाख रुपयांत करू शकता परदेशात पर्यटन
सोलापूर : आध्यात्मिक पंढरी म्हणून सोलापूरची ओळख असलेल्या या जिल्ह्यात पर्यटनासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यांतून अनेक भाविक येतात तसेच सोलापुरातील अनेक पर्यटक पर्यटनासाठी परदेशात जातात. श्रीलंका, नेपाळ यासह शेजारील देशांमध्ये एक लाख रुपयांमध्ये दोन पर्यटकांचे परदेशातील पर्यटन होते. त्यास
5 hours ago
हेही वाचा: Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीचा आर्यनला सल्ला

यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राणी पाटीदारसोबत कौन बनेगा करोडपतीचा खेळ सुरू केला. राणी अतिशय हुशारीने प्रश्नांची उत्तरे देत पुढे गेली. २० हजाराच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर हूटर वाजल्याने राणी पाटीदार यांना थांबावे लागले. अमिताभ बच्चन यांनी दुसऱ्या दिवशी भेटण्याचे आश्वासन देऊन सेट सोडला.कौन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) काही नियम आधीच बदलण्यात आले आहेत. फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये पूर्वी फक्त एकच प्रश्न विचारला जायचा आणि सर्वांत जलद उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला संधी मिळायची. आता अमिताभ तीन प्रश्न विचारतात आणि त्यानंतर कोणत्या स्पर्धकाने सर्वांत वेगवान उत्तरे दिली याची सरासरी काढली जाते. यानंतर हॉटसीटवर बसण्याची संधी दिली जाते.

Sort:  

plase like my all post 7 days