Government job : ONGCमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; पगार ६० हजार Published on : 10 October 2022, 9:23 am

in #digras2 years ago

By
नमिता धुरी

मुंबई : ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) लिमिटेडने सहाय्यक कार्यकारी अभियंता, केमिस्ट यांसारख्या अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण ८७१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. GATE 2022 मधील यशस्वी उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.ongc.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२२ आहे. (ONGC Graduate Trainee Vacancy 2022)

हेही वाचा: UPSC recruitment : पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची संधी

रिक्त जागांचा तपशीलएकूण पदे - 871महत्त्वाची तारीखऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 22 सप्टेंबर 2022अर्ज करण्याची शेवटची तारीख - १२ ऑक्टोबर २०२२वय मर्यादाया पदांसाठी फक्त 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.शैक्षणिक पात्रताअर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BE, BTech, ME, MTech, MSc पदवी सिव्हिल/मेकॅनिकल इत्यादी असणे आवश्यक आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र पात्रता विहित करण्यात आली आहे.

हेही वाचा: Indian Navy Recruitment 2022 : नौदलात मुलाखतीविना १०वी उत्तीर्णांची भरती

पगारया पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना 60,000 ते 1,80,000 रुपये पगार दिला जाईल.अर्ज फीसामान्य, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये भरावे लागतील. तर, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड कागदपत्रं पडताळणीद्वारे केली जाईल.कुठे अर्ज करायचाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना recruitment.ongc.co.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

Sort:  

अहो सर लाईक करा