अन् एका फोन कॉलमुळे दंगलीतील फरार आरोपी पोलिसांना सापडला, कॉन्स्टेबलची हत्या आणि ५० पोलिसांना

in #digras2 years ago

Ratan-Lala.jpgमाझं घर ठीक आहे का? पोलिसांनी ते पाडलं तर नाही ना किंवा इतर कोणी ताब्यात घेतलंय का?” शेजाऱ्याला केलेल्या या एका फोनमुळे दोन वर्षांनी आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. २०२० मध्ये दिल्लीमधील झालेल्या दंगलीत एका हेड कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. तसंच ५० हून अधिक पोलिसांना जखमी केल्याचाही आरोप आहे. पोलीस गेल्या दोन वर्षांपासून फारर झालेल्या या आरोपीचा शोध घेत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद वसीम असं या आरोपीचं नाव आहे. आपली ओळख बदलत तो उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी वास्तव्य करत होता. वसीमने या काळात आपल्या कुटुंबाशी कोणताही संपर्क साधला नव्हता. यादरम्यान त्याचं कुटुंबही दिल्लीत वास्तव्यास गेलं होतं.