दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला पडणार महागात? महिला आयोगाचे कारवाईचे आदेश

in #digras2 years ago

सोलापुर जिल्ह्यातील अकलूज येथे एक अजब विवाह सोहळा शुक्रवार 2 डिसेंबरला पार पडला होता. या अजब विवाह सोहळ्याची चर्चा राज्यभर सुरु आहे. या विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. कारण एक वर आणि दोन वधू असा हा लग्नसोहळा पार पडला होता. उच्चशिक्षित दोन जुळ्या बहीणींनी चक्क एकाच मुलासोबत इच्छेने लग्न केलं आहे. हा अनोखा विवाह सोहळा अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे पार पडला आहे. परंतु दोन जुळ्या बहिणींशी लग्न करणं नवरदेवाला चांगलच महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. या नवरदेवाविरोधात पोलीस ठाण्यात NCR दाखल करण्यात आली आहे..jpg