दिल्लीतील एम्स रुग्णालयात सायबर हल्ला; दोघांना केले निलंबित

in #digras2 years ago

![worthem_news__32_.jpg]ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्लीचा सर्व्हर दोन दिवस उलटूनही सुरळीत झालेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एम्सचा लॅन इंटरनेट सर्व्हरही गुरुवारी संध्याकाळी बंद करावा लागला. सध्या एम्स कॅम्पसमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा वापरली जात आहे. त्याचवेळी सायंकाळी उशिरा एम्स व्यवस्थापनाने संगणक शाखेशी संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एम्स व्यवस्थापनाने एका निवेदनात रॅन्समवेअर सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली होती परंतु सुरक्षा यंत्रणांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही)