Viral Video: ...म्हणून मला निलंबित केलं, इन्स्टावर फेमस महिला कंडक्टरने मांडली व्यथा

in #digras2 years ago

Osmanabad: सध्या एका महिला कंडक्टरला कामावरून निलंबित करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऑन ड्युटी रील्स बनवल्याने तिला कामावरून काढून टाकल्याचं समोर आलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचं सांगत महामंडळाने या महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे. आता यावर खुद्द निलंबित महिला कंडक्टरने प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये ही महिला कर्मचारी कार्यरत होती. प्रतिक्रिया देताना तिने स्टाफवर आरोपही केले आहेत. अनेक बस कर्मचारी ऑन ड्युटी डेपोच्या आवारात व्हिडिओ बनवतात तरी माझ्यावरच कारवाई का? असा प्रश्न तिने माध्यामांमार्फत उपस्थित केलाय.

तसेच एसटी संपाच्या मोर्च्यात सहभागी झाली नाही म्हणून माझ्यावर राग काढत मला अधिकाऱ्यांनी निलंबित केले असल्याचा आरोपही तिने केलाय. या सगळ्या प्रकरणामुळे फेमस टीक टॉकर कंडक्टर महिलेचे फॉलोवर्सही कमी झाले असं ती म्हणाली. अनेक कर्मचारी माझा तिरस्कार करतात. त्यामुळे मी व्हिडिओ बनवताच मला निलंबित करण्यात आलं मात्र अनेक कर्मचारी कित्येकदा ऑन ड्युटी डेपोच्या आवारात व्हिडिओ बनवत असतात मात्र त्यांच्यावर कधी कारवाई करण्यात आली नसल्याचेही ती म्हणाली.

एसटी संपात सहभाही झाले असते तर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोणी केला असता असा जाब तिने माध्यमांना विचारलाय. एसटी संपाच्या मोर्च्यात मी सहभागी झाले नाही म्हणून रागात मला निलंबित करण्यात आलं असल्याचा दावा तिने माध्यमांपुढे केलाय.Canva__720___1280_px___1_.png