Shivsena : 'मन मोठं करून जसं शिवाजी पार्क दिलं तशी सत्ताही द्या'

in #digras2 years ago

मुंबई : दसरा मेळाव्याबद्दल उत्सुकता शिगेली पोहचली असून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा बीकेसी मैदाणावर होणार आहे. यादरम्यान आग्रह धरला असता तर आम्ही शिवतीर्थ मिळवले असते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, त्यांच्या या विधानाला शिवसेनेकडून खोचक शब्दात उत्तर दिले आहे.

राज्यात दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवेसना एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान शिवतीर्थावर शिवसेनाचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाता दसरा मेळावा होणार आहे. यापूर्वी शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट कोर्टात देखील गेले होते. यानंतर मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आणि त्यानंतर शिंदे गट सुप्रिम कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान यानंतर शिवाजी पार्क बद्दल एकनाथ शिंदे म्हटले होते की, आग्रह धरला असता तर आम्ही मिळवले असते. यावर शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदे यांनी मन मोकळं ठेवावं आणि शिवसेनेला सत्ता देऊन टाकावी.दसरा मेळावा निमित्त आदिशक्तीचा जागर होण्यासाठी बये दार उघड ही मोहीम ६ जिह्यात शिवसेना युवासेना कडून राबवण्यात आली आहे. या मोहिमेचा वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधणे हा त्याचा हेतू होता. सर्व शक्तीपीठांच्या ठिकणी आम्ही भेट दिली अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली. राज्यात महिला सुरक्षा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: Eknath Shinde: चंद्रकांत पाटलांचा CM शिंदेंना अप्रत्यक्ष टोला; त्यांची लोकप्रियेता...

पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटावर टीका देखील केली आहे, त्या म्हणाल्या की, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे चारित्र्य हनन करायचे हे षडयंत्र त्यांनी आखलेली आहे. रोजगार संदर्भात वेदांत प्रकल्पावरून आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यात आले, आदित्य ठाकरे हे असत्य सांगत आहेत असे त्यांच्यावर आरोप झाले असेही त्या म्हणाल्या . शिवसेना मेळावा अदभुत होईलदोन्ही मेळाव्यात स्पर्धा आहे. दसरा मेळावा आमचा सांस्कृतिक वारसा आहे. यंदाचा शिवसेना मेळावा अदभुत आणि वाजत गाजत होईल असेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो असता तिथे अनेक जणांच्या तक्रारी होत्या. रोजगाराचा विषय होता असे त्या म्हणाल्या.SAKAL_NEWS_BANNER__45___1_.png