नितीश कुमार लागले २०२४ च्या तयारीला

in #desh2 years ago

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे. नितीश कुमार यांनी म्हटलं की, देशात बिगर भाजप सरकार आल्यास मागास राज्यांना विशेष दर्जा दिला जाईल. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. यानतंरच ते सातत्यानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सपाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांसोबत चर्चा करत आहेत.
बिहारमध्ये भाजपला सत्ताधारी आघाडीतून बाहेर केल्यानतंर आता अशी चर्चा आहे की, मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून दावा करू शकतात. दरम्यान, त्यांनी स्वत: ह्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. नुकतंच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे बिहारमध्ये आले होते. तेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर नितीश कुमार चर्चा दुसरीकडेच नेताना दिसत होते.

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चर्चेनंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारी नितीश कुमार यांनी माजी राजनैतिक अधिकारी पवन वर्मा यांची भेट घेतली होती. प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या भेटीमध्ये पवन वर्मा यंची भूमिका महत्त्वाची होती. या चर्चेबद्दल नितीश कुमार यांनी म्हटलं होतं की, "त्यांनाच विचारा काही विशेष चर्चा झाली नाही."

2020 मध्ये पवन वर्मा आणि प्रशांत किशोर यांनी जदयूमधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानतंर वर्मा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. मात्र तिथूनही ते काही काळाने बाहेर पडले. प्रशांत किशोर आणि नितीश कुमार यांच्या भेटीची चर्चा होण्याचं कारण म्हणजे गेल्या काही काळापासून दोघेही एकमेकांवर टीका करत आहेत.
images (13).jpeg