Mumbai Airport : मुंबई विमानतळ सर्व्हर डाऊनचं मेट्रो कनेक्शन; प्रवाशांना सोसावा लागला मनस्ताप

in #darwa2 years ago

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सुरु असलेल्या मेट्रोचा कामामुळे सर्व्हर वायर तुटल्याने विमातळावरील सर्व्हर डाऊन झाल्याची घटनासमोर आली आहे; त्यामुळे सर्व विमान कंपन्यांच्या प्रवाशांना चेक इन करताना मोठ्या उशीर होत होता. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी मॅन्युअल प्रक्रिया सुरू करण्यात आली . यानंतर मुंबई विमानतळावरील सर्व्हरमधील तांत्रिक अडचण रात्री ७.२० वाजता दूर करण्यात आली.