Milind Narvekar: कोण आहेत मिलिंद नार्वेकरांची जागा घेणारे रवी म्हात्रे?

in #dailyupdate2 years ago

esakal_new__5_.jpgएकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत अनेक बदल केले जात आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे उजवा हात अशी ओळख असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांच्या ऐवजी आता रवी म्हात्रे यांच्यावर अधिक जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Right Hand Ravi Mhatre Replaces Milind Narvekar )
मागील काही दिवसांपासून रवी म्हात्रे यांचा मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या वर्तुळात वावर वाढळा आहे. खरे म्हणजे रवी म्हात्रे मधल्या काही काळात शिवसेनेत फारसे सक्रीय नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडापासून ते शिवसेनेत पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत.