Sumeet Pusavle: 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' फेम सुमितचे रोमँटिक फोटो व्हायरल...

in #daily2 years ago

Saturday, December 3, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Sumeet Pusavle: 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' फेम सुमितचे रोमँटिक फोटो व्हायरल...
Published on : 3 December 2022, 1:09 pm
Authored by सकाळ डिजिटल टीम, Edited by सकाळ डिजिटल टीम
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून घरोघरी पोहोचलेला अभिनेता सुमित पुसावळे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. त्याने होणाऱ्या पत्नीसोबतचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. संत बाळूमामा यांच्या भूमिकेत घरोघरी पोहोचलेला सुमित लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. नुकताच सुमितचा साखरपुडा पार पडला आहे. सुमितनं त्याच्या साखरपुड्याच्या दिवशीचे फोटो आणि प्रिवेडिंगचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याच्यावर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सुमितनं १६ नोव्हेंबर रोजी एक पोस्ट करत आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव मोनिका आहे. आता त्याला बोहोल्यावर चढतांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याआधी त्यांच्या एका फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली होती. या फोटोत सुमित गुडघ्यावर बसून होणाऱ्या पत्नीला प्रपोज करतांना दिसला होता. त्याचा हा फोटोही नेटकऱ्यांमध्ये व्हायरल झाला आहे. चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.esakal_new___2022_12_03T182039_900.jpg