IAS Tina Dabi यांची 12 वीची मार्कशीट व्हायरल, गुण पाहून तुम्हीही म्हणाल...

in #daily2 years ago

523315-iuigrrgftf.jpegमुंबई : IAS टिना डाबी (Tina Dabi) यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक कायम उत्सुक असतात. देशातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी अशी टीना डाबी यांची ओळख आहे. या ना त्या कारणाने त्या नेहमीच चर्चेत असतात.सोशल मीडियावर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर 1.6 मिलियन पेक्षा जास्त त्यांची फॉलोइंग आहे. त्या इंस्टाग्रामवर (tina dabi instagram) रोज नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. आता टीना दाबी यांची 12 वीची मार्कशीट इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे.
टीना दाबी लहानपणापासूनच एक हुशार आहेत. त्या UPSC 2015 बॅचच्या टॉपर आहेत. यासोबतच त्या 12 वीमध्ये सीबीएसई टॉपर आहेत. 9 नोव्हेंबर 1993 साली जन्म झालेल्या टिना यांच्या 12 व्या मार्कशीटवर तुम्हाला विश्वासही बसणार नाही.

टीना यांनी 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत राज्यशास्त्र आणि इतिहासात 100 पैकी 100 गुण मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यांनी पदवीच्या पहिल्या वर्षातच यूपीएससीची तयारी सुरू केली होती. (tina dabi 12th percentage)