Maharashtra Politics: 'रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करावं, अशी माझी इच्छा होती', सत्तारांनी पुन्हा डिवचलं

in #all2 years ago

राज्यात सत्तांतर झालं आणि राजकारणात खळबळ माजवणाऱ्या घटना घडल्या. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि दोन गट स्थापन झाले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी यांच्यावरतीही आरोप प्रत्यारोप करण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
अब्दुल सत्तार बोलताना म्हणाले की, किमान त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी समोर ठेवला होता. मुख्यमंत्री पदी असताना अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले दिसले होते. मी मंत्री असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार अशा शब्दात सत्तार यांनी टीका केली आहे.Ankita_Khane___2022_11_26T132952_972.jpg