विचारावा स्वतःलाच प्रश्न...

in #all2 years ago

प्रतिमा जोशी pratimajk@gmail.comराजस्थानात इंद्र मेघवालला साधं पाणी प्यायला म्हणून मारहाण झाली. या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट होण्याऐवजी दरवर्षी वाढच होते आहे. सात ते नऊ टक्के अशी ही वाढ सुबुद्ध, सुजाण व्यक्तीला अस्वस्थ करणारी आहे. खरं तर शिक्षण, आधुनिकीकरण, दळणवळणामुळे सारं जगच जवळ येण्यानं समाजाचा स्तर उंचवायला हवा होता. असा विषमताधिष्ठित अवमान आणि हिंसा हळूहळू इतिहासजमाच व्हायला हवी, परंतु चित्र नेमकं उलटं दिसत आहे.इंद्र मेघवाल हे नाव पुढेमागे खेळाडू, उगवता शास्त्रज्ञ, कलावंत, लेखक किंवा किमानपक्षी विद्यापीठातील हुशार विद्यार्थी म्हणून आपल्याला माहीत पडलं असतं का ते सांगता येत नाही. कदाचित पडलंही असतं. अगदीच काही नाही, तर छोटामोठा रोजगार कमावून भारताचा एक सन्मानाने जगणारा नागरिक अशी ओळख तर आपण त्याला नक्कीच देऊ शकलो असतो. या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे खरं तर. त्यांच्यासाठी तसं वातावरण तयार करणं, संधी निर्माण करणं ही शासनासह आपणा सर्व प्रौढ नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्यही आहे.

Sort:  

Good news Visit on my profile to sir