कर्णधार धवनसह ‘हे’ सात खेळाडू भारतात परतलेच नाही, ‘असा’ आहे संघाचा पुढचा प्लॅन
भारतीय संघ गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) बांगलादेश दौऱ्यासाठी ढाका येथे पोहचणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि जे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाचा भाग नव्हते हे सर्व खेळाडू गुरुवारी ढाका येथे पोहचतील. मात्र, शिखर धवन समवेत बरेच खेळाडू यावेळी न्यूझीलंडमध्ये आहेत, ते सर्व शुक्रवारी (दि. 2 डिसेंबर) भारतीय संघासोबत असतील. भारत आणि बांगलादेश संघ 4 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यामध्ये समोरासमोर असतील.
भारतीय संघाचा एकदिवसीय मालिकेच्या पराभवाने न्यूझीलंड दौऱ्याचा शेवट झाला. भारताचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र, भारतीय संघाचे काही खेळाडू अजूनही न्यूझीलंडमध्ये आहेत. भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) बरोबरच श्रेयस अय्यर(Shreyas Iyer), रिषभ पंत (Rishabh Pant), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar