यांना जबर फटका; मे महिन्यात १४०० कोटी बुडाले, नुकसान वाढले

in #yavtmal2 years ago

देशासह जगभरातील अनेक घटनांचे प्रतिकूल पडसाद भारतातील शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. शेअर बाजाराचे बिग बूल अशी ओळख असलेल्या Rakesh Jhunjhunwala यांनाही बाजारातील पडझडीचा मोठा फटका बसला आहे. मे महिन्यात तब्बल १४०० कोटींचे नुकसान राकेश झुनझुनवाला यांना सोसावे लागले आहे.राकेश झुनझुनवाला यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनाही याचा मोठा फटका बसला आहे. शेअर मार्केटमधील ३ कंपन्यांच्या शेअर्समुळे Rakesh Jhunjhunwala यांना मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health and Insurance) आणि मेट्रो ब्रँड्स (Metro Brands) च्या शेअर्सच्या किंमतीत गेल्या महिन्याभरात मोठी घसरण दिसून आली आहे. मेट्रो ब्रँड्सचे शेअर ५६२ रुपयांवरून घसरून ५२३ रुपयांवर आला आहे