राजकारणासह इतर क्षेत्रातही संपर्क आवश्यक - अनुराग ठाकूर

in #yavtmal2 years ago

पुणे : राजकारण करताना केवळ राजकीय क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क ठेवणे पुरेसे नाही. तुमचा जनाधार वाढण्यासाठी इतर क्षेत्रातील व्यक्तींसोबत चांगले संबंध असले पाहिजेत, असे असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. पुणे दौऱ्यावर असलेल्या अनुराग ठाकूर यांनी शासकीय विश्रामगृह येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अर्चना पाटील आदी यावेळी उपस्थित ठाकूर म्हणाले, राज्यात भाजपला काम करण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. कोणत्याही पदावर भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याने राजकारण करीत असताना त्याने खेळासारख्या अन्य क्षेत्रात ही काम करावे, ज्यामुळे पक्षाचा पाया व्यापक होऊन जनाधार वाढण्यास मदत होईल. मुळीक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, पांडे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आणि पोटे यांनी आभार मानले.0e8b3e44_72a3_4184_97af_0a18fa4b6baa.jpg