राज्यात 24 तासांत कोरोना बाधितांचा उच्चांक; चिंतेत भर

in #yavtmal2 years ago

ताज्या
शहर

मनोरंजन
निवडणूक
देश
ग्लोबल
फोटो
आणखी

राज्यात 24 तासांत कोरोना बाधितांचा उच्चांक; चिंतेत भर
Published on : 9 June 2022, 12:58 pm

By
सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत नव्या कोरोना (Corona) बाधितांच्या आकडेवारीने उच्चांकी नोंद केली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात नव्या 2, 813 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद केली जात आहे. त्यात आज या आकडेवारीने नवा टप्पा पार केला आहे. 2,813 नव्या रुग्णांपैकी 1,702 रूग्ण एकट्या मुंबईतील असल्याने येथील नागरिकांचीदेखील चिंता वाढली आहे.PANCHANG_1.jpg