भीम ॲपद्वारे पैसे पाठवले, पोहोचले नाहीत; तर काय कराल?

in #yavtmal2 years ago

माझ्या वडिलांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी भीम ॲपद्वारे पॉलिसीचे ८०५०/- भरले. बँक खात्यातून रक्कम डेबिट झाली. पण, लाभार्थीच्या खात्यात मिळाली नाही. बँक हा प्रश्न सोडवत नाही. पैसे वसूल करण्यासाठी मी काय करावे?

भारत सरकारने डिसेंबर २०१६ मध्ये भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) या नावाचे पेमेंट ॲप तयार केले. त्याद्वारे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून साध्या, सोप्या आणि जलदगतीने व्यवहार करणे शक्य झाले. २००८ साली स्थापन केलेल्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ह्या किरकोळ पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम चालवणाऱ्या मध्यवर्ती संस्थेशी संलग्नता घेतली गेली. भीम ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः पैसे हाताळत नाहीत. पैसे देणारा पक्ष आणि पैसे स्वीकारणारा किंवा पैसे घेणारा पक्ष यांच्यातला – म्हणजे ह्यांच्या बँकांमधला दुवा म्हणून ते काम करते.

देणाऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम नावे टाकणे आणि घेणाऱ्याच्या खात्यावर जमा होणे हा व्यवहार तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नाही. त्यावेळी असे घडण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते. अयशस्वी व्यवहाराबद्दल तक्रार करण्यासाठी, ‘अयशस्वी व्यवहारावर’ क्लिक केल्यानंतर ‘व्यवहार’मध्ये उपलब्ध ‘व्यवहार तपशील’ पृष्ठावरील ‘ राइज कंप्लेंट’वर क्लिक करा. साधारण तीन दिवसात रक्कम तुम्हाला परत केली जाते.

तसे न झाल्यास तुम्ही भीम ॲपशी https://www.bhimupi.org.in/get-touch ह्या लिंकवर संपर्क साधू शकता. भीमॲपचा टोल फ्री नंबर १८०० १२० १७४० वर देखील तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. तांत्रिक चुकीसाठी तुमची बँकच जबाबदार असते. भारत सरकार आणि रिझर्व बँकेच्या संयुक्त प्रयत्नातून भीम ॲप तयार झालेले असल्याने बँकांना ग्राहकांच्या तक्रारींची दखल घ्यावीच लागते. तुमच्या बँकेने प्रश्न न सोडवल्यास रिझर्व बँकेने स्थापन केलेल्या बँकांच्या लोकपालाकडे तुम्ही तुमच्या बँकेविरुद्ध तक्रार दाखल करू शकता.