अनुपमा आणि अनुजचा लग्नात सात वचन घेण्यास नकार, वनराजच्या एंट्रीमुळे मंडपात पसरणार शांतता

in #yavtmal2 years ago

गेल्या दोन वर्षांपासून अनुपमा ही मालिका टेलिव्हिजनवरील नंबर वन शो राहिली आहे. मात्र, मध्येच शोचा टीआरपी थोडा घसरला. पण अनुज आणि अनुपमाच्या प्रेमकथेने तो संभाळून घेतला. या शोमधील अनुज-अनुपमाचा रोमान्स चाहत्यांना खूप आवडला होता. त्यामुळेच निर्मात्यांनी दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. कालपर्यंत वनराज आणि सासू लीला शाह यांचे टोमणे ऐकणारी अनुपमा आता अनुजची पत्नी झाली आहे.

अनुपमाला नेहमीच काहीतरी वेगळे करायचे असते.यासाठी तिला अनुजची साथ नेहमी मिळते. अनुज आणि अनुपमाचे लग्नही खास स्टाइलमध्ये पार पडले. या दोघांनी सात फेरे घेण्याऐवजी केवळ एका शब्दाने आपल्या अतूट नात्याचा पाया रचला. तो खास शब्द म्हणजे 'आदर'. लग्नाच्या दिवशी 'सम्मान' म्हणत अनुज-अनुपने एकमेकांना कायम साथ देण्याचे वचन दिले.

बूट लपवले नाहीतटेलिव्हिजनच्या अनोख्या लग्नात अनुपमाच्या कुटुंबीयांनी अनुजचे बूट चोरले नाहीत आणि त्याचा मोबाईल चोरला. घरच्यांना वाटलं की इतरांप्रमाणेच अनुजचाही जीव मोबाईलमध्ये अडकला असावा. त्यामुळेच बूट लपवण्याऐवजा त्याचा फोन घेतला. पण कदाचित अनुजचा जीव फोनमध्ये नसून अनुपमामध्ये राहतो हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे फोन चोरीला गेल्यावर अनुजला विशेष फरक दिसला नाही.

वनराजची होणार एंंट्रीअनुज आणि अनुपमा लग्नाचे विधी सुरु होतात. मग डॉलीची मुलगी म्हणेल की या लग्नात काहीतरी अपूर्ण वाटत आहे कारण इथे मामा (वनराज) नाही. तेव्हा वनराजची एंट्री होईल आणि अनुपमाला धक्का बसेल. अनुपमाला वाटेल की वनराजच्या येण्यामुळे तिच्या लग्नात खूप गदारोळ होणार आहे, पण तिची भीती काही क्षणात संपेल. वनराज तिचे लग्नाबद्दल अभिनंदन करेल. यासह, अनुपमा आणि अनुज लग्नाचे उर्वरित विधी पार पाडतील आणि आयुष्यात एकत्र पुढे जातील.

शोचे चाहते अनुपमा आणि अनुजच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. वधूच्या गेटअपमध्ये अनुपमा एखाद्या अप्सरासारखी दिसत होती. त्याचबरोबर अनुजलाही वराच्या वेशात रुबाबदार दिसत होता. अनुपमा वेडिंग एपिसोडला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अनुज आणि अनुपमाच्या लग्नाचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल होतायेत.