मुख्यमंत्री अडकल्याने अधिकाऱ्याला शिक्षा, हलगर्जीचा ठपका ठेवत १०० रुपयांचा दंड

in #yavtmal2 years ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचा ताफा सकाळी सव्वादहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानावरुन विधान भवनाच्या दिशेने निघाला. दरम्यान एअर इंडियापासून पुढे साखर भवनपर्यंत जात असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी येथील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सहायक पोलीस फौजदाराला १०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्याला वर्षा या निवासस्थानावरून विधान भवनाच्या दिशेने जाताना एअर इंडियापासून पुढे साखर भवनपर्यंत वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. याप्रकरणी एका सहायक पोलीस फौजदाराला वाहतुकीचे नियमन, नियंत्रण, कर्तव्यामध्ये हलगर्जी केल्याचा ठपका ठेवून १०० रुपयांच्या दंडाची शिक्षा देण्यात आली. वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी ही बंदोबस्त ठेवला होता. यात वांद्रे-कुर्ला घटना घडली. विधिमंडळाच्या संकुल वाहतूक विभागाच्या एका पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस फौजदाराची २२ वाहतूक पोलिसांनी विधान भवन, ऑगस्टला मरीन ड्राइव्ह वाहतूक मंत्रालय, मंत्र्यांची शासकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 'गैंडानिवासस्थाने या मार्गावर वाहतुकीची पॉइंट' येथे नेमणूक केली होती.