औरंगाबाद हादरले; एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा हत्या, कॉलेजसमोरून नेले ओढत

in #yavtmal2 years ago

औरंगाबाद : एकतर्फी प्रेमातून कॉलेजसमोरून तरुणीस ओढत नेत हत्या केल्याची शहराला हादरवणारी घटना आज दुपारी देवगिरी महाविद्यालय परिसरात घडली. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, आज शहरात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. देवगिरी महाविद्यालयाजवळ घटना घडली आहे. दुपारी तरुणी महाविद्यालयाबाहेर आली असता एक तरुण तिथे आला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तरुणीस कॉलेजसमोरून २०० फुट ओढत नेत तरुणाने तिला चाकूने भोसकले. हा धक्कादायक प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची माहिती आहे. भर दिवसा हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली असून त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाले आहे. शरण सिंग असे संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे.

आज शहरात दोन खुनाच्या घटना दरम्यान, आज शहरात खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. देवगिरी महावियालाजवळ तरुणीला ओढत नेत खून, जिन्सी पोलीस स्टेशन हद्दित किरकोळ वादातून एकाचा खून, अशा दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

आणखी वाचा