Tu Tevha Tashi: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत अनपेक्षित ट्विस्ट; प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज

in #yavtmal2 years ago

अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत. नुकतेच एका गाण्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी नटूनथटून सेटवर हजेरी लावली.झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या मालिकेतील अनामिका (Shilpa Tulaskar) आणि सौरभची (Swwapnil Joshi) अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणीसोबत नील आणि राधाची प्रेमकहाणीदेखील प्रेक्षकांना पाहायला आवडतेय.