Pune : चांदणी चौकातील पुलामुळे पुणे ट्रेंडींगमध्ये

in #yavtmal2 years ago

पुणे : पुणेकर आहे तो मोडेल पण वाकणार नाही, झुकेगा नही साला, एवढी स्फोटके कशाला हवीत पुणेरी टोमणे मारले असते तरी लगेच पडला असता...बर्लिनच्या भिंतीप्रमाणे पुणेकरांनी आठवण म्हणून एक दगड जरी घरी न्यावा, म्हणजे जेसीबीची गरज नसती पडली..... आशा एक ना अनेक मीम्सने समाजमाध्यमांवर पुणे आणि चांदणी चौक रविवारी सकाळपासूनच ट्रेंडींगवर होता. चांदणी चौकातील पूल रविवारी पहाटे पाडण्यात आला. ६०० किलो स्फोटके लावल्यानंतरही पुलाचा थोडा भाग पडायचा बाकी होता. त्यामुळे सकाळपासूनच विविध मिम्स फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर फिरायला लागले.