PFI Protest : पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर CM शिंदेंचं ट्वीट; म्हणाले...

in #yavtmal2 years ago

Eknath Shinde On PFI Protest : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यावरून आता राजकारण तापलेले असताना यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.