हुबळीजवळ ट्रक, खासगी बसचा भीषण अपघात, कोल्हापूरच्या दोघांसह सहाजण ठार, २६ जण जखमी

in #yavtmal2 years ago

हुबळीजवळ धारवाडच्या तरिहाळा बायपासवर ट्रक आणि खासगी आराम बसची भीषण धडक झाली. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले. तर २६ जखमी झाले. मध्यरात्री १२ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन जण कोल्हापूरचे व दोन कर्नाटक मधील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.खासगी आराम बस कोल्हापूरहून बंगळूरूकडे निघालेली होती. आराम बस धारवाडजवळ आली असता त्याच वेळी पुण्याहून बंगळूरूकडे ट्रक जात होता. दोन्ही वाहनांची हुबळीजवळ धडक होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये ट्रक चालक, किन्नरचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील ठार झालेल्या चार प्रवासामध्ये दोन कोल्हापूरचे तर दोन कर्नाटक येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघातात २६ जण जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.