दीड महिन्यात पोलीस आयुक्त संजय पांडे करणार शिवसेनेत प्रवेश"

in #yavtmal2 years ago

आपल्या विरोधात बोगस एफआयआर दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांच्यावर केला होता. त्यावरूनच आता भाजपा आक्रमक झालं असून पक्षाचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. त्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी संजय पांडेंसंदर्भात आणखी एक मोठं विधान केलं आहे

संजय पांडे यांना येत्या दीड महिन्यात शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, असं विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्या म्हणाले,"मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांना येत्या दीड महिन्यामध्ये शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेत आहोत आणि गरज पडल्यास या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयातही जाऊ. "