मोदी सरकारची आठवी वर्षपूर्ती; देशभर गुंजणार हनुमान चालिसा

in #yavtmal2 years ago

नवी दिल्ली : राज्यात एकीकडे हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठनावरून घमासान सुरू असताना आता, मोदी सरकारच्या आठव्या वर्षेपूर्तीनिमित्त हनुमान चालिसाचं पठन केलं जाणार आहे. भाजपकडून देशभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. एवढेच नव्हे तर, मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमाना चालिसेचे पठणही केले जाणार आहे. या अंतर्गत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि देशाची सत्ता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडे गेली. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून याचे आयोजन करण्यात आले आहे. (BJP Announced Hanuman Chalisa Path On 8th Anniversary )गेल्या महिनाभरापूर्वीच भाजपकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमान चालिसाचे पठन केले जाणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी संमेलन, युवा संमेलन आणि मागासवर्गीयांसाठीचे संमेलन आयोजित केले जाणार आहे. मोदी सरकारच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि नेते मंडळी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे म्हणणे आहे की सरकारने देशात उज्ज्वला, जन धन, हर घर नल अशा अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला आहे. सरकार आपल्या सर्व योजनांच्या मदतीने देशाला नवीन भारताच्या निर्मितीकडे घेऊन जाण्याचा दावा करत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकार अमृत महोत्सवही साजरा करत आहे.