Hardik Pandya: धोनीसारखाच मीदेखील सक्षम! हार्दिक पांड्याने दिले कायमस्वरूपी कर्णधार बनण्याचे संकेत

in #yavtmal2 years ago

अहमदाबाद : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेचे अनुकरण करण्याची मला सवय झाली असून, दडपणातही शेवटपर्यंत खेळून सामना जिंकून देण्याचे आव्हान स्वीकारत असल्याचे मत भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या याने गुरुवारी मांडले. हार्दिकने स्वत:ची तुलना धोनीशी करीत त्याला टीम इंडियाचा नवा धोनी बनायचा आहे, शिवाय कायमस्वरूपी कर्णधारपदही भूषवायचे आहे, असे संकेत दिले.

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की, त्याने स्वतःला कायम कर्णधार मानले. संघ व्यवस्थापन रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या (टी-२० क्रिकेटमध्ये) पुढे गेले आहे. भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा विक्रमी १६८ धावांनी पराभव केला. यासह मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. मागच्या सामन्याचा हीरो ठरलेल्या हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत शानदार कामगिरी केली. शतकवीर शुभमन गीलला सामनावीर आणि हार्दिकला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. सामन्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना त्याने स्वतःची तुलना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी केली.

कसोटीचे नंतर बघूया...आगामी वन डे आणि टी-२० विश्वचषकावर नजर ठेवून सध्या मर्यादित षटकांच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे हार्दिक म्हणाला. हार्दिकने २०१८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. याविषयी विचारताच हार्दिक म्हणाला,‘ कसोटी खेळण्याची ही योग्य वेळ आहे, असे वाटेल तेव्हाच मी या प्रकारात पुनरागमन करेन. सध्या पांढऱ्या चेंडूवर लक्ष देणे गरजेचे आहे.’

भारतीय संघाचा धोनी व्हायचेयहार्दिक म्हणाला,‘माही भारतीय संघासाठी जी भूमिका वठवित असे, ती भूमिका साकारण्यास मी सज्ज आहे. त्यावेळी मी संघात नवीन होतो आणि मैदानात सर्वत्र फटके मारायचो. पण, धोनीनंतर अचानक ती जबाबदारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेण्यात कुठलीच अडचण नाही. आम्हाला योग्य निकाल मिळाले पाहिजेत त्यात मला जरा हळू खेळावे लागले तर तरी चालेल.’ मला नेहमीच षटकार मारण्यात मजा येते. पण हा आक्रमक खेळ आता मला सर्वच ठिकाणी खेळून चालणार नाही.

कारण प्रत्येक वेळी सामन्यातील परिस्थिती वेगळी असते. खेळपट्टी, मैदानाची लांबी, विरोधी संघ आणि धावफलक त्यातही धावसंख्या उभारताना किंवा त्याचा पाठलाग करताना कसे खेळायचे यावर मी विचार करीत आहे. मी भागीदारीवर विश्वास ठेवतो आणि माझ्या फलंदाजी भागीदाराला आणि मी तिथे असलेल्या संघाला काही आश्वासन आणि शांतता देऊ इच्छितो. यातील बहुतांश सामने मी खेळले आहेत. मी दडपण कसे हाताळायचे हे शिकलो आहे.

hardik-pandya-212_202302956531.jpg