राज्यात पावसाचा हाहाकार; मुसळधार पावसाचा इशारा

in #yavatmalmumbai2 years ago

मुंबई : रविवारी (काल) दुपारनंतर राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्याला काल सायंकाळी जोरदार पावसाने झोडपल्याने पुढच्या दोन दिवसांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून कोकण आणि विदर्भासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे