भारतात गर्दीच्या ठिकाणी हल्ल्याचं षडयंत्र; ३ पाक दहशतवाद्यांकडून मोठा खुलासा

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली - हैदराबाद इथं हँड ग्रेनेडसह ३ दहशतवाद्यांना पकडलं आहे. पाकिस्तानात बसलेला दहशतवादी फरहतुल्ला गौरीसोबत ते संपर्कात होते. भारतातील गर्दीच्या ठिकाणी हँडग्रेनेडनं हल्ला करून लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्याचा प्लॅन होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने यूएपीए कायद्यातंर्गत फरहतुल्ला गौरीला दहशतवादी घोषित केला आहे. देशातील ३८ कट्टर दहशतवाद्यांमध्ये फरहतुल्ला गौरीचं नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

गुप्तचर यंत्रणाच्या माहितीनुसार, फरहतुल्ला गौरी उर्फ अबू सुफियान आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा प्रमुख चेहरा आहे. हैदराबादमध्ये जाहेद, हसन फारूख आणि मो. समीमुद्दीनच्या अटकेनंतर पुन्हा एकदा फरहतुल्लाचं नाव समोर आले. पोलिसांनी या ३ दहशतवाद्यांना हैदराबादमध्ये पकडलं. त्यांच्याकडून ४ हँडग्रेनेड आणि ५ लाख ४१ हजार रुपये जप्त करण्यात आले. फरहतुल्लाच्या आदेशावरून गर्दीच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखली असल्याचं पोलीस तपासात समोर आले.

हैदराबादमधून फरार होऊन सध्या पाकिस्तानच्या बसलेला दहशतवादी फरहतुल्ला गौरी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतात जिहाद पसरवण्यासाठी युवकांची माथी भडकवतो. मार्च २०२२ मध्ये फरहतुल्लाबाबत माहिती समोर आल्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी ऑगस्टमध्ये अलर्ट जारी केला. २००२ मध्ये गुजरातच्या अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यातील आरोपी फरहतुल्ला गौरी भारतातून फरार होऊन पाकिस्तानला गेला. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने फरहतुल्लाला पुन्हा २०२२ मध्ये सक्रीय केले आहे. फरहतुल्लाच्या माध्यमातून भारतात हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेले.

ISI ने युट्यूबवर Sawat Ul Haqq आणि Voice of Truth नावानं एक चॅनेल उघडलं. त्या माध्यमातून फरहतुल्ला गौरी भडकावू विधाने करू लागला. अहमदाबाद ब्लास्टच्या ३८ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर फरहतुल्लाने पहिले भाषण अपलोड केले. उदयपूरात कन्हैया लालच्या हत्येनंतर फरहतुल्लाच्या भाषणाला जबाबदार धरलं गेले. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या हालचालीवर भारतीय गुप्तचर यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

sceiazjcekwo29aza0_202210891198.jpg