नात्यातील मुलीसोबत प्रेमसंबंध; तरुणीच्या नावे भावाने मेसेज केला, प्रेमी येताच केली हत्या

in #yavatmal2 years ago

हतनूर (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे या तरुणाचा चुलत मावस बहिणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मावस भावास अटक केली असून न्यायालयाने त्यास शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे याचे खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथील त्याच्या चुलत मावस बहिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. सदरील मुलगी वडिलांच्या मोबाइलवरून विशालसोबत बोलत असे. तसेच चॅटिंग करीत असे. याची कुणकुण लागल्याने सदरील मुलीचा भाऊ आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने त्याच्या वडिलांच्या मोबाइलवरून सदरील मुलीच्या नावाने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मेसेज पाठवून विशाल यास चिंचोली शिवारात बोलावून घेतले. त्यामुळे विशाल हा दोन मित्रांसह चिंचोली शिवारात गेला असता आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने रागाच्या भरात काही कळण्याच्या आत त्याच्या जवळील लाकडी दांड्याने चुलत मावस भाऊ विशालच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार वार केला. तसेच विशालच्या दंडावर, खांद्यावर, मांडीवर जबर मारहाण केली. सोबतच्या मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला ; परंतु कृष्णा पवार याने त्यांना जुमानले नाही. दरम्यान लाकडी दांड्याचा खनाच्या भागाचा जोराचा फटका बसल्याने विशालच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली. जखमी अवस्थेत त्यास त्याच्या घराजवळील मंदिराजवळ सोडण्यात आले. यानंतर विशाल घरी गेला व अंघोळीसाठी अंगावरील कपडे काढत असताना खाली कोसळला. त्यानंतर त्यास उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी मृत घोषित केले.

आरोपीला घरातून केली अटकलाकडी दांडक्याने डोक्यात वार करून विशाल लव्हाळे यास जिवे मारल्या प्रकरणी मयताचे वडील रमेश सांडू लव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा दिगांबर पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्यानंतर शुक्रवारी आरोपीस कन्नड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर. भालेराव, सहायक पोलीस निरीक्षक राम बारहाते पुढील तपास करत आहे.

murderinjharkhand_202207858022.png