मुंबईला हादरवण्याची अजून एक धमकी...

in #yavatmal2 years ago

मुंबई : मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई विमानतळाला शनिवारी रात्री धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. हा ईमेल येताच विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र, विमानाची तपासणी केली असता तसे काहीही आढळून आले नाही. अशा परिस्थितीत बॉम्ब असल्याचा दावा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर एक ईमेल आला, ज्यामध्ये इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 6045 मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे लिहिले होते.2how_20to_20send_20confidential_20mails_20in_20Gmail_20with_20expiry_20date_20know_20tricks.jpg