श्रद्धाची हत्या गळा दाबून नाही तर.. दिल्ली पोलिसांची नवीन थिअरी, घटनेची मोठी अपडेट

in #yavatmal2 years ago

दरम्यान, ताज्या अपडेटनुसार श्रद्धाची हत्या आधी गळा दाबून झाली नसेल तर.. या थिअरीवर दिल्ली पोलीस काम करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपला तपास योग्य मार्गावर असल्याचा दावाही दिल्ली पोलिसांनी केला आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील ताजे अपडेट्स श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या दक्षिण रेंजच्या जवळपास 10-12 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

या तुकड्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कसून तपास करत आहेत. आफताब आणि श्रद्धा यांच्या घरातून हाडे, रक्ताचे नमुने, गॅजेट्स आणि सामानाचा समावेश असलेल्या 30-35 हून अधिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. काही प्रवासी कागदपत्रेही जप्त करण्यात आली असून तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. प्रियकराची पत्नी ठरत होती नात्यात अडसर, रागात पुण्यातील प्रेयसीने केलं भयानक कांड सर्व सोशल मीडिया अॅप्स आणि अकाउंटचा तपास सुरू आहे.

दुसरीकडे आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले आहे की, त्याने दिल्लीतील एका तलावात श्रद्धाचे शीर फेकले. यानंतर दिल्ली पोलीस रविवारी संध्याकाळी छतरपूर जिल्ह्यातील मैदान गढी येथे पोहोचले. मात्र, सध्या तलाव परिसरात शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. आफताबला आता पश्चाताप होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
n4440122741669086124111ad64893f50e8638b258f8fb4aa0caa7afb6b5b112eb12d038a233a93f21b7f57.jpg