महाराज आमचं दैवत, त्यांची तुलना...', राज्यपालांचा विषय मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपवला!

in #yavatmal2 years ago

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे, काँग्रेसनेही राज्यपालांच्या विधानाचा निषेध केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. महाराज आमचं दैवत आहेत, पिढ्यानपिढ्या दैवत राहील, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल 'जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच असतील.

आमचे हिरो छत्रपती शिवाजी महाराजच असतील, त्यामुळे यावर वाद व्हायचं कारण नाही, असं मला वाटतं. राज्यपाल्यांच्या मनातही हे स्पष्ट आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आदर्श कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा कोणताही दुसरा अर्थ काढला जाऊ नये, असं मला वाटतं,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांकडून डॅमेज कंट्रोल, पण उदयनराजे कोश्यारींवर आक्रमक, थेट अमित शाहंकडेच जाणार!काय म्हणाले होते राज्यपाल? 'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे.

आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली.n44407445416690711081152bf10d799bf265dd9e82e5dc271bacc5fbf28535ac03d494179994fd74b02a6f.jpg