शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद करा

in #yavatmal2 years ago

पंचाहत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांना सांगण्यात आले, रासायनिक खते वापरा, कीडनाशके फवारा, बँकेचे कर्ज घ्या, सिंचनाची शेती करा, शेततळे करा, ट्रॅक्टर घ्या, पाइप लाइन टाका, लाइट घ्या, इंच इंच शेती लागवडीखाली आणा आणि उत्पादन वाढवा. किती राबवलं शेतकऱ्यांना गुलामासारखा? देशात ८५ टक्के अल्पभूधारक संख्या असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतीत अचानक बदल करायला सांगितले तर ते त्यांना झेपेल का, याचा विचार केला पाहिजे.

काय परिस्थिती आहे शेतीची?

ॲग्रोवनमध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला, की तो दिवस केवळ फोन घेण्यासाठीच राखून ठेवावा लागतो. फोन करणारे शेतकरी घरच्या माणसासारखे अंतरीचे दुखणे उघडतात. २८ सप्टेंबरचा माझा लेख वाचून आलेल्या असंख्य फोनपैकी तीन शेतकऱ्यांशी झालेले संवाद देशातील शेतीची परिस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. त्यामुळेच त्या फोनवरील संभाषणाचा ऊहापोह येथे होणे मला गरजेचे वाटते. त्या तीन फोनपैकी एक पाथ्रीचा, एक कोल्हापूरचा आणि एक नाशिकचा शेतकरी होता.

१) पाथ्रीचा शेतकरी सांगत होता, साहेब मी चार एकराचा अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्या पोरीला शिकायचे होते. तिच्या शिक्षणाचा खर्च मला भागवता येणार नव्हता. पोरीला म्हणालो, बाळा, तुझ्या शिक्षणाचा खर्च मला झेपणार नाही. तू शिकायचा नाद सोड. लगेच ती म्हणाली, ‘बाबा मग यापुढे मी तुम्हाला कधीच दिसणार नाही.’ माझे आणि माझ्या मुलीचे बोलणे तीन वेळा झाले. पोरीचे हे बोल माझ्या जिव्हारी लागले, मी पार हादरून गेलो.

Also read:
Agriculture Policy : अस्थिर धोरणामुळे अस्तित्व धोक्‍यात!
मग ठरवले काय होईल ते होईल, शक्य होईल तोपर्यंत तिच्या शिक्षणाचा खर्च करीन, ज्या दिवशी शक्य होणार नाही, त्या दिवशी जिवाचं बरंवाईट करून घेईन. सध्या ती पुण्यात इंजिनिअरिंग करते आहे. सांगताना त्याचा जडावलेला आवाज स्पष्ट जाणवत होता. ‘यापुढे मी तुम्हाला दिसणार नाही’ हे पोरीचे बोल ऐकताना माझेही काळीज चिरत गेले. त्याचं बोलणं बराच वेळ शांतपणे ऐकून घेतलं, अंतःकरण मोकळं करू दिलं. शेवटी म्हणालो, हे बघा, जमीन, जायदाद, पैसा या गोष्टी आपल्या मुला-बाळांसाठीच ठेवतो ना? तुमची जमीन आणि जे असेल ते भांडवल मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी वापरा.

ते जिवंत राहिले तर तुमच्या जमिनीचा फायदा, तेच नसतील तर जमीन काय उपयोगाची? शेती राहील जाईल, याची चिंता करू नका. मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे करा. तीच तुमची संपत्ती आहे हे लक्षात घ्या. आणि हो जिवंत राहिलात तरच त्यांचं भविष्य घडवाल, उगाच आततायीपणा करू नका, शांतपणे मार्ग काढा. आणखी एक बाब लक्षात घ्या, त्यांनी तुमच्या पोटी जन्म घेण्यासाठी विनंती केलेली नव्हती, तुम्ही त्यांना जन्माला घातलंय, त्यांची जबाबदारी पार पाडा. मग मात्र तो शेतकरी भानावर आला. म्हणाला, साहेब, माझ्या जवळच्या नातेवाइकांनी सुद्धा अशी हिंमत आणि समज मला कधी दिली नाही, जी तुम्ही दिली. मी पुण्यात आल्यावर तुमची भेट नक्की घेईन, असे म्हणून तो थांबला.

Also read:
Crop Damage : अतिवृष्टीसदृश पावसामुळे पिके मातीमोल
२) कोल्हापूरचा तीन एकर जमिनीचा शेतमालक, शेती आणि मार्केटिंग करतो. त्याने सांगितले, साहेब, माझा मुलगा अकरावीला आहे. लाख संकटे आली तर बेहत्तर पण मी त्याला शेतीकडे फिरकू देणार नाही.नाशिकचा शेतकरी, तीन एकरचा मालक. बराच वेळ अंतःकरण मोकळं करताना म्हणाला, मी भाजीपाला केला, द्राक्षे लावली, जिल्हा बँकेचं कर्ज घेऊन झालं, खासगी बँकांकडून कर्ज घेतलं, मायक्रो फायनान्स पालथे घातले आणि आता खासगी सावकारी काढली. कर्ज तरी किती काढू? खताचे, बियाण्याचे, कीडनाशकांचे भाव दुप्पट- तिप्पट झाले. शेतीचा खर्च तिपटीने वाढलाय. उत्पादन कितीही वाढवलं तर बाजारात मार खावा लागतोय. कोरोनाच्या काळात आम्ही घरात बसलो नाय. कोरोनानंतर तर आपत्ती हात धुऊन पाठीमागे लागलीय. बायको म्हणते सोनंनाणं गेलं, पोरं म्हणत्यात शाळेच्या फीस द्या, शेताचे खर्च भागवावे का घराचे? काही सुधरंना गेलंय, जगणं मुश्कील झालंय. शब्दापलीकडे मी तरी काय देणार, माझ्या सांत्वनाने त्यांच्या परिस्थितीत फरक थोडाच पडणार आहेagrowon_2022-06_6716f197-1840-4fc8-8e4a-cef88c5b5316_News_Story___2022_06_03T195402_231.png