ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का?

in #yavatmal2 years ago

त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरु आहे. त्या पार्श्वभूमिवर भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर आणि शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

'सरकारनामा ओपन माईक' सिजन 2 या कार्यक्रमात आमदार मनीषा कायंदे बोलत होत्या. या वेळी भाजप आमदार अतुल भातखळकर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात भातखळकर यांनी मनीषा कायंदे यांना प्रश्न विचारला उद्धव ठाकरे यांच्याकडे १५-१६ च आमदार राहिले आहेत. त्यामुळे तुम्हाला भवितव्य धुसर झाले आहे, असे वाटते का? यावर कायंदे यांनीही स्पष्ट उत्तर दिले. मी शिवसेनेत आल्यानंतर मला सहा वर्षानंतर विधान परिषदेवर संधी मिळाली. पहिली संधी उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अस्थिर आहे. त्यामुळे आपल्यापैकी कुणाला काय मिळेल हे सांगता येत नाही, असा चिमटा त्यांनी काढला. त्यामुळे ठाकरे यांना सोडण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले.

शिंदे गटात प्रवेश करणार असलेल्या दिपाली सय्यद म्हणाल्या, बाहेरून आलेल्यांनी तुमची जागा घेतली, तर त्रास होतो का? त्यावर कायंदे म्हणाल्या, मी पक्षात आल्यावर माझ्या अगोदरचेही अस्वस्थ झाले असतील. आता कुणी नवीन आले, तर मी असवस्थ व्हावे, असे अजिबात नाही. दुसऱ्याची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष मोठी करा, असा सल्ला त्यांनी दिला. n4437655881668989248139477042eff6f0fd3f6d4244e2c9248b07526ed6b5fc66121567f8929338317d12.jpg